​भोसरी-आळंदी रोड खड्डेमुक्त करा; अन्यथा खड्ड्यांनाच श्रद्धांजली अर्पण करू – योगेश ठाकरे


दिनांक २९ जुलै

​भोसरी-आळंदी रोड खड्डेमुक्त करा; अन्यथा खड्ड्यांनाच श्रद्धांजली अर्पण करू – योगेश ठाकरे

​भोसरी (प्रतिनिधी):

भोसरी-आळंदी रोड हा भोसरीतील प्रमुख बाजारपेठेचा आणि सर्वाधिक वर्दळीचा मुख्य रस्ता असून, सध्या या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य चौकापासून गोविंद गार्डनपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

​खड्डे इतके मोठे झाले आहेत की, अनेक ठिकाणी बसची चाकेही त्यात रुतून बसतात. दुचाकीस्वारांना अपघाताचा सतत धोका निर्माण झाला असून, वाहतूकही संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

​या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने भोसरी-आळंदी रोडवरील खड्डे बुजवून रस्ता खड्डेमुक्त करावा, अन्यथा उद्यापासून या खड्ड्यांचाच प्रतीकात्मक “श्रद्धांजली कार्यक्रम” आयोजित करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग प्रमुख योगेश ठाकरे यांनी दिला आहे.

​यावेळी सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

​प्रतिनिधी : विजय अडसूळ


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!