CWG 2026 मध्ये भारताचा ऐतिहासिक पराक्रम; गुलवीर सिंग यांना १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक.
ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या गुलवीर सिंग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. त्यांनी २७ मिनिटे ४९.७८ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले.
या कामगिरीसह १०,००० मीटर शर्यतीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय पुरुष ॲथलीट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात त्यांच्या नावाची सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या काई रॉबिन्सन यांनी सुवर्णपदक जिंकले, तर आयल ऑफ मॅनच्या डेव्हिड मुलार्की यांनी कांस्यपदकावर नाव कोरले.
गुलवीर सिंग यांच्या या ऐतिहासिक यशामुळे कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडली असून हे भारताचे १२ वे पदक ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





