शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे कडक आदेश


शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे कडक आदेश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात उच्च फॅट, साखर आणि मीठ असलेल्या (HFSS) जंक फूडची विक्री करण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.
या निर्णयानुसार शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी आवश्यक अन्न परवाना (Food License) घेणेही अनिवार्य असेल.
एफडीएने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, विक्रेते आणि संबंधित संस्थांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार दंडात्मक तसेच कडक कारवाई करण्यात येईल.
या निर्णयामुळे शाळांच्या परिसरात चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड स्नॅक्स, साखरयुक्त पेये आणि इतर जंक फूडच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!