दादर स्थानकात पोलिसांचे शौर्य; धावत्या लोकलखाली झोपलेल्या तरुणाचा जीव वाचवला


दादर स्थानकात पोलिसांचे शौर्य; धावत्या लोकलखाली झोपलेल्या तरुणाचा जीव वाचवला

मुंबई, दादर (प्रतिनिधी): दादर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एका तरुणाने धावत्या लोकलखाली झोपून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर लोकल येत असताना संबंधित तरुण अचानक रुळावर उतरून धावत्या गाडीखाली झोपला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस शिपाई ए. ए. नरवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने त्या तरुणाला गाडीखालून सुरक्षित बाहेर काढले.
घटनेचा संपूर्ण प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांच्या या शौर्यपूर्ण कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या समुपदेशनाची व्यवस्था केली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान त्याने आपले नाव व पत्ता सांगण्यास नकार दिला असून, या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!