माळशेज घाटातील रस्ता खचला; आळेफाटा-कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद


माळशेज घाटातील रस्ता खचला; आळेफाटा-कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद

माळशेज घाटातील रस्ता खचला; आळेफाटा-कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद
आळेफाटा :
सततच्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे परिसरात रस्त्याचा काही भाग खचल्याने आळेफाटा-कल्याण मार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याखालील माती वाहून गेल्याने रस्त्याचा काही भाग खचला. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने तातडीने सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आणि सुरक्षिततेची पाहणी सुरू आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास माळशेज घाट मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आळेफाटा-कल्याण दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी स्वप्नील लुनावत


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!