पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू


पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू.

Oplus_16908288

पिंपरी-चिंचवड : शहरातील मोरवाडी परिसरात आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून पत्नी आणि १६ वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक संकट आणि कर्जाच्या ताणामुळे कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे तसेच परिसरातील माहितीच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाच्या परिस्थितीबाबत अधिक तपास केला जात आहे. पोलिसांकडून घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी – शाम शिरसाठ पुणे


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!