ज्ञानदानाच्या कार्याला सलाम; प्रा. स्वरूपानंद सिनकर यांचा बारी समाजाच्या वतीने सत्कार


ज्ञानदानाच्या कार्याला सलाम; प्रा. स्वरूपानंद सिनकर यांचा बारी समाजाच्या वतीने सत्कार

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी महेंद्र बेराड): मूळचे पानवडोद (ता. सिल्लोड ) येथील आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेले प्रा. स्वरूपानंद सुनील सिनकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा तेलंग्रे कुटुंबीय आणि अखंड बारी समाज संघटनेच्या वतीने सहकुटुंब सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

अल्पवयात पितृछत्र हरपल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. नांदेड व पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा परिसरात फिजिक्स विषयाचे स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र सुरू केले. विद्यार्थ्यांना केवळ विषयाचे ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे NEET-2026 परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ आयोजित “गुणवंत विद्यार्थी स्वागत समारंभ” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय बारी समाज महासंघ जालना आणि संभाजीनगर च्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. स्वरूपानंद सिनकर यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी अनेक विद्यार्थी यशाचे शिखर गाठतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!