धर्माचार्य डॉ. किशोर देशपांडे यांना ‘महामंडलेश्वर’ पदवी प्रदान; आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सन्मान


धर्माचार्य डॉ. किशोर देशपांडे यांना ‘महामंडलेश्वर’ पदवी प्रदान; आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सन्मान

​कळवण: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कळवणचे सुपुत्र धर्माचार्य डॉ. किशोर नलिनी रमेश देशपांडे यांना पंचदशनाम गुरुदत्त आखाड्याच्या वतीने ‘महामंडलेश्वर’ या राष्ट्रीय बहुमानाने सन्मानित करण्यात आले आहे. या सोहळ्यात त्यांचा पट्टाभिषेक करून ‘डॉ. किशोर गिरी महाराज’ असे नामकरण करण्यात आले.
​उत्तर प्रदेशातील क्रांतिकारी भूमी बावन इमली परिसरातील, सिमौर (जि. फतेहपूर) येथील इच्छापूर्ती गुरुदत्त आश्रम उमाशंकर धाम येथे गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा सोहळा पार पडला. पुरोहितांच्या वेदमंत्रोच्चार, सप्तसुरांचा मंगलध्वनी आणि सप्तनद्यांच्या पवित्र तीर्थाने डॉ. देशपांडे यांच्यावर पट्टाभिषेक करण्यात आला.
​पंचदशनाम गुरुदत्त आखाडा (भारत नोंदणी क्र. १०६) द्वारे आयोजित या सोहळ्यात देश-विदेशातील सनातनी महिला-पुरुष तसेच तृतीयपंथी साधूंना संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, मंडलेश्वर, महामंडलेश्वर आणि श्री श्री १००८ अशा विविध उपाधींनी सन्मानित करण्यात आले.
​आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व कोषाध्यक्ष श्री अनिरुद्ध महाराज यांनी डॉ. किशोर गिरी महाराज यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रातून आष्टाणे येथील गुरुदत्त आश्रमाचे १००८ महामंडलेश्वर आचार्य अवधूत गिरी महाराज, पुण्याचे महामंडलेश्वर भैरव महाराज आणि जालन्याचे महामंडलेश्वर शाम महाराज यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
​या प्रसंगी उपस्थित संत-महंतांनी सनातन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक व्हावा, असा मनोदय व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822848429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!