अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांची ब्राह्मण महासंघ नाशिक अध्यक्ष बाळाभाऊ पाठक यांना सदिच्छा भेट
नाशिक: अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान विविध संत-महंतांच्या तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेण्यात आल्या. याच दौऱ्यात ब्राह्मण महासंघ, नाशिकचे अध्यक्ष श्री. बाळाभाऊ पाठक यांचीही भेट घेण्यात आली. या वेळी हिंदुत्वाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
भेटीदरम्यान श्री. बाळाभाऊ पाठक यांनी नाशिक परिसरात गोरक्षण तसेच लव्ह जिहाद या विषयांवर सुरू असलेल्या सामाजिक जनजागृती आणि कार्याची माहिती दिली. हिंदुत्व, धर्मरक्षण आणि गोरक्षणासाठी भविष्यातही खंबीरपणे सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी अखिल भारत हिंदू महासभेतर्फे श्री. बाळाभाऊ पाठक यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच श्री. बाळाभाऊ पाठक यांच्या हस्ते हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयसिंग कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे, सहकार्यवाह नितीन शुक्ल, प्रदेश समन्वयक उमेश कुलकर्णी, हर्षल अमृतकर आणि कौस्तुभ झाकडी यांचा शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी हिंदू समाज संघटन, सामाजिक समन्वय आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429








