अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक किटचे मोफत वाटप
पुणे : लोकसेवा बहुजन महासंघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला अखिल भारत हिंदू महासभेने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमादरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला आणि आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी हिंदू महासभेच्या महिला प्रदेश समन्वयक सौ. आदिती जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले.
लोकसेवा बहुजन महासंघाच्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची दखल घेत अखिल भारत हिंदू महासभेतर्फे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीदादा सरोदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास हिंदू महासभेचे प्रदेश पदाधिकारी श्री. राजेंद्र देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हिंदू महासभेचे पुणे युवा अध्यक्ष अजय कांबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतला.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरी केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी. 9822548429








