पवई तलावाजवळ दुचाकीला अचानक आग; परिसरात एकच खळबळ
मुंबई (पवई): पवई येथील हिरानंदानी इस्टेट परिसरातील पवई तलावाजवळ एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी घडली. आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई
Views: 52








