तारापूर एमआयडीसीत विराज प्रोफाइल कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगार जखमी


तारापूर एमआयडीसीत विराज प्रोफाइल कंपनीत भीषण स्फोट; ३ कामगार जखमी

पालघर : बोईसर येथील तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीच्या SMS-1 प्लांटमध्ये सोमवारी सकाळी फर्नेस टँकमध्ये एकापाठोपाठ तीन जोरदार स्फोट झाले. या दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की कारखान्याचे पत्रे आणि काचा दूरवर उडाल्या. घटनेच्या वेळी कंपनीत सुमारे १०० ते १५० कामगार उपस्थित होते. स्फोटामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!