जळगावच्या १४ कर्तृत्ववान शिक्षकांचा ‘विनोबा पुरस्कार’ने गौरव
जळगाव | दि. १७ ऑगस्ट २०२६: जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शिक्षण प्रयोग, विद्यार्थीकेंद्री उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या १४ शिक्षकांचा ‘विनोबा पुरस्कार’ देऊन जिल्हास्तरीय गौरव करण्यात आला. जुलै २०२६ मधील उत्कृष्ट कार्याची दखल घेत Post of the Month, Community Club, Morning Assembly, Poetry Recitation आणि Story Telling या विविध श्रेणींमध्ये शिक्षकांची निवड करण्यात आली.
‘Post of the Month’ श्रेणीमध्ये विद्या जोशी (नांद्रा), स्मृती साबळे (माहीजी), कविता जाधव (कोळन्हावी), हिना शेख (अडावद) आणि मनीषा अहिरे (जि.प.प्रा.शा. बॉईज नं. २) यांचा गौरव करण्यात आला. तसेच अनिता शिंगारे (तोंडाळे), पल्लवी शिंदे (हातेड बु.), कविता वाघ (जळू), दिपाली पवार (फापोरे बु.), सरिता पाटील (कजगाव), आशा वाणी (अहिरे खुर्द), वैशाली निसर्गन (देऊळगाव), सविता करवटे (धामणगाव) आणि विजय बागुल (वराड बु.) यांना विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षकांचे हे कार्य जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास नक्कीच मदत करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी सोमेश मुळे







