घोडबंदर रोडवर कारला अचानक आग; चालकासह तिघे सुखरूप
विशेष प्रतिनिधी | ठाणे
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहिनी-ब्रह्मांड सिग्नलजवळ एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.
कारमध्ये चालकासह दोन प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच तिघांनीही तातडीने कारमधून बाहेर पडत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 27





