बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूने हल्ला


बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूने हल्ला

राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील वाडा रोड परिसरात रविवारी रात्री कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली. पती आणि त्याच्या बहिणीशी पत्नी बोलत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या महेंद्र दौंडकर (४५) याने पत्नी दीपा दौंडकर (४०) यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
या घटनेदरम्यान त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याने आईच्या हत्येचा प्रकार पाहिल्यानंतर आरोपी वडिलांनी त्याच्यावरही हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने ओढणीने मुलाचा गळा आवळण्याचा तसेच चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, अथर्व याने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
राजगुरुनगरमधील ‘संगम गार्डन’ इमारतीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी महेंद्र दौंडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!