शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चुका दुरुस्त करता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चुका दुरुस्त करता येणार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : शाळा सोडल्यानंतर विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात (TC/Leaving Certificate) नाव, जन्मतारीख किंवा अन्य नोंदींमध्ये झालेली नजरचूक अथवा चुकीची नोंद दुरुस्त करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाच्या पूर्णपीठाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यार्थी संबंधित शाळा सोडून गेला आहे, हे केवळ तांत्रिक कारण दाखवून त्याला अधिकृत शैक्षणिक रेकॉर्डमधील चुकीची नोंद दुरुस्त करण्यापासून वंचित करता येणार नाही.
योग्य पुरावे सादर करणे आवश्यक
दाखल्यातील नोंद दुरुस्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीने वैध आणि विश्वासार्ह कागदपत्रे व पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे. पुराव्यांच्या आधारे नोंद चुकीची असल्याचे स्पष्ट झाल्यास, नियमानुसार दुरुस्ती करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय
शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी जन्मतारीख, नाव किंवा इतर महत्त्वाच्या नोंदींमध्ये चुका आढळल्यास विद्यार्थ्यांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा व्यक्तींना योग्य पुराव्यांच्या आधारे आपल्या शैक्षणिक कागदपत्रांमधील चुका दुरुस्त करून घेण्यासाठी महत्त्वाचा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे केवळ तांत्रिक कारणांपेक्षा वास्तविक नोंद, उपलब्ध पुरावे आणि विद्यार्थ्याच्या हक्कांचा विचार करण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!