सुपेघाटात ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली; ४ ते ५ विद्यार्थी जखमी


सुपेघाटात ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली; ४ ते ५ विद्यार्थी जखमी

बारामती : पाटस येथून बारामतीतील विद्याप्रतिष्ठान संकुलाकडे सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सुपे घाटात अपघात झाला. या अपघातात बस उलटल्याने ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरून शाळेचे मुख्याध्यापक तसेच डॉक्टरांशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!