आंबेगाव पठार पोलीस चौकीत ८ अल्पवयीन मुलांशी गैरवर्तनाचा आरोप; ११ पोलिसांवर गुन्हा


आंबेगाव पठार पोलीस चौकीत ८ अल्पवयीन मुलांशी गैरवर्तनाचा आरोप; ११ पोलिसांवर गुन्हा

पुणे : आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना कायदेशीर मुदतीपेक्षा अधिक काळ ताब्यात ठेवून त्यांच्याशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. काही मुलांना बेल्टने मारहाण केल्याचे तसेच अनुसूचित जातीतील मुलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप मानवाधिकार आयोगाच्या चौकशीमध्ये समोर आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या आदेशानंतर करण्यात आली. सीआयडीच्या ‘फॅक्ट फाइंडिंग’ अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया, त्यांच्याशी झालेल्या कथित मारहाणीचे प्रकार आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत पुढील तपास सुरू आहे. प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन प्रक्रियेत पडताळणी होणे बाकी आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!