पंढरपुरात २६ सप्टेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा; शरद पवार करणार नेतृत्व


पंढरपुरात २६ सप्टेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा; शरद पवार करणार नेतृत्व

पंढरपूर : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी पंढरपुरात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यातील अनेक भागांत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत द्यावी, तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी, या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार असून, शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!