चिखली घरकुल टाऊन हॉल येथे गणरायाला भक्तिभावपूर्ण निरोप.


पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त चिखली येथील घरकुल टाऊन हॉल परिसरात लाडक्या गणरायाला भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणेशभक्तांनी गणरायाचे विसर्जन केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग, आरोग्य निरीक्षक तसेच मनपा कर्मचाऱ्यांच्या आणि बीव्हीजी कर्मचारी यांच्या सहकार्याने विसर्जनस्थळी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांकडून स्वच्छता, परिसर व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला निरोप दिला. विसर्जनाच्या ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांनी दिवसभर सेवा बजावत परिसरातील स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
भक्तीमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात चिखली घरकुल टाऊन हॉल येथील गणपती विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे





