निल देठे व साईराज वाडकर यांचे बुद्धिबळ स्पर्धक उत्कृष्ट प्रदर्शन; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड..


निल देठे व साईराज वाडकर यांचे बुद्धिबळ स्पर्धक उत्कृष्ट प्रदर्शन; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

टाकळीभान प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व श्रीरामपूर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडल्या.

श्रीरामपूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डीडी काचोळे विद्यालयाच्या निल देठे व साईराज वाडकर यांची उत्कृष्ट कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 

या स्पर्धेत डीडी काचोळे माध्यमिक विद्यालयातील चिरंजीव निल देठे (वय १४ वर्षे) तसेच चिरंजीव साईराज वाडकर (वय १७ वर्षे) यांनी बुद्धिबळाच्या पटावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली.

दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कौशल्य, संयम, डावपेचांची अचूकता आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे सर, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे सर, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, गुरुकुल प्रमुख रवींद्र निकम, अजित कदम, वसतिगृह अधीक्षक भराड सर, मार्गदर्शक . सुनील खाडे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!