जळगाव जामोद येथे नागवेली महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन


जळगाव जामोद येथे नागवेली महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन

जळगाव जामोद : प्रतिनिधी / महेंद्र बेराड : नागवेली महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणा संस्थेच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव जामोद येथील चौभारा चौक येथे उत्साहात पार पडले.

नागवेली माता कृपेने आणि संत रुपलाल महाराज यांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर संस्थेच्या वतीने जळगाव जामोद येथे नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. महिला बचतगट, लघुउद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून सहकार्य करण्याच्या उद्देशाने संस्थेचा विस्तार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमास जळगाव जामोदचे नगराध्यक्ष श्री. गणेश रामेश्वर दांडगे, उपनगराध्यक्ष श्री. कैलास मोतीराम पाटील, अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष महेंद्र बेराड, महासंघाचे स्थानिक पदाधिकारी, जळगाव जामोदचे नगरसेवक राजू हिस्सल, रुपेश येऊल, डॉ. काळपांडे, कपले, तसेच भारज येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेश दामधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माऊली बोडखे यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संत श्री रुपलाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजामाता यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष गणेश दांडगे आणि उपनगराध्यक्ष कैलास पाटील यांच्या हस्ते फीत कापून नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. मोहित किरणदास बैरागी, श्री. वैभव वसंत काळपांडे आणि सौ. प्रतिभा भगवंत पवार (बारी) यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरस्वती देवीदास पायघन, अध्यक्ष श्री. देवीदास बाबुराव पायघन, सचिव श्री. राम बाबुराव पायघन तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने मान्यवरांचा स्वागत-सत्कार करण्यात आला.

ग्राहकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे : महेंद्र बेराड

यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना महेंद्र बेराड म्हणाले, “अल्पावधीतच नागवेळी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने तीन शाखा यशस्वीपणे चालवत आपल्या भागात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. जळगाव जामोद येथील ही संस्थेची चौथी शाखा असून, या नवीन शाखेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ग्राहकांचा विश्वास आणि विश्वासार्हता जपली, तर संस्थेचा विकास निश्चितच होत असतो.”

तसेच संस्थेने आगामी काळात सुनगाव, अंजनगाव सुर्जी आणि अकोट या परिसरातही शाखांचा विस्तार करावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

बारी समाजातील युवा उद्योजक देवीदास पायघन यांच्या पुढाकाराने संस्थेच्या माध्यमातून सुमारे २० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, याबद्दलही महेंद्र बेराड यांनी त्यांचे कौतुक केले. समाजातील युवकांनी उद्योजकतेकडे वळून रोजगार निर्माण करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नवीन शाखेमुळे जळगाव जामोद परिसरातील नागरिकांना संस्थेच्या विविध आर्थिक सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळणार आहे. महिला बचतगट, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी सुविधा उपलब्ध होणार असून, संस्थेच्या माध्यमातून महिला व युवा उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील पारध, वालसावंगी, भारज, पिंपळगाव सैलानी आदी गावांतील प्रतिष्ठित नागरिक, महिला बचतगटांच्या सदस्यांसह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारध शाखेचे व्यवस्थापक पंकज फुसे तसेच कर्मचारी पवन फुसे, मनोहर पायघन, दिनेश तेलंग्रे आणि शिवम ठाकूर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!