कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मृतदेह आढळला


कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मृतदेह आढळला

पिंपरी-चिंचवड : कौटुंबिक वादातून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कर्मचारी विजय कोळी यांनी सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बुधवारी सकाळी सरकारी पिस्तुल घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर विजय कोळी यांचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनचीही मदत घेण्यात आली.
दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!