दारूच्या दुकानात शिरली गर्भवती माकडीण; क्वार्टर संपवून घातला गोंधळ


दारूच्या दुकानात शिरली गर्भवती माकडीण; क्वार्टर संपवून घातला गोंधळ

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे एका दारूच्या दुकानात घडलेल्या अनोख्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. गर्भवती माकडीण अचानक दारूच्या दुकानात शिरली आणि तिने दारूची एक क्वार्टर बाटली पूर्ण प्यायल्याचे सांगितले जात आहे.
दारू प्यायल्यानंतर माकडीण दुकानातच बेधुंद होऊन पडून राहिली. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर तिने दुकानात मोठा गोंधळ घातला. यावेळी तिने दुकानातील एका कर्मचाऱ्याचा चावाही घेतल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पथकाने माकडीणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील उपचारासाठी नेले. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!