ठाकरे बंधू एकवटले; ज्ञानेश कुमारांविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत ‘जनमोर्चा’
मुंबई : मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रियेत (SIR) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी केल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘जनमोर्चा’ काढण्यात येणार आहे.
संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या मोर्चाबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ४ ऑक्टोबरच्या जनमोर्चाची माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची भूमिका एकत्रितपणे पुढे येण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 53








