१९ वर्षांनंतर जुळल्या जुन्या आठवणी; गोदावरी हिंदी विद्यालयाच्या २००६-०७ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात


१९ वर्षांनंतर जुळल्या जुन्या आठवणी; गोदावरी हिंदी विद्यालयाच्या २००६-०७ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

चिंचवड : चिंचवड येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालयाच्या २००६-०७ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन सोहळा (Reunion) निगडी (यमुनानगर) येथील दुर्गा चौक स्थित Seasons Banquet Hall येथे उत्साहपूर्ण आणि भावुक वातावरणात पार पडला. तब्बल १९ वर्षांनंतर जुने वर्गमित्र-मैत्रिणी आणि शिक्षक एकत्र आल्याने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली. जीवनाचा योग्य मार्ग दाखविणाऱ्या गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी अनेक शिक्षक आणि माजी विद्यार्थी भावुक झाले.
या सोहळ्यात केक कटिंग, माजी विद्यार्थी व शिक्षकांचे मनोगत, गाणी, नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवण म्हणून ट्रॉफी वितरित करण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला. ग्रुप फोटोग्राफीच्या माध्यमातून या अविस्मरणीय भेटीचे क्षण कॅमेऱ्यात कायमचे कैद करण्यात आले.

या सोहळ्याला माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री. मिश्रा सर, श्रीमती मुखर्जी मॅम, श्रीमती कुमावत मॅम, श्रीमती संधू मॅम, श्रीमती सुकुमारी मॅम, कुसुम तिवारी मॅम, श्रीमती जीजा मॅम, श्रीमती सरकार मॅम, श्री. सुरेश पांडेय सर, श्री. राय सर, श्री. हरिकेश सिंह सर, श्रीमती बलजीत मॅम, श्रीमती थीटे मॅम, श्रीमती वंदना मिश्रा मॅम, श्री. पिंगळे सर, श्री. आथरे सर, श्रीमती लीना मॅम, श्रीमती सरिता पांडेय मॅम, श्री. अवधेश पांडेय सर, श्री. शुक्ला सर, श्री. बबलू पांडेय सर, श्रीमती पदमा टकले मॅम, श्रीमती मीना म्हस्के मॅम, श्री. माळी सर, श्रीमती आरती जगताप मॅम, श्रीमती उर्मिला मॅम, श्री. राजू शिंदे सर तसेच शाळेचे कर्मचारी श्री. राधेश्याम भैया जी, चव्हाण भैया जी, रमेश पांडेय भैया जी, श्री. सावंत भैया जी आणि श्री. भोला भैया जी यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्मिता काचा, ममता बिडलानी, मुनिश दिनोदिया, राजेश गौड़, विजय वाल्मीकि, संतोष शर्मा, शबनम शेख, आसिफ उस्मानी, शोयब सैफी, उपेंद्र सिंह, वसीम खान, संतोष यादव, भवानी राठौड़ आणि भारत वर्मा या माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
एल्युमिनी ग्रुप स्थापण्याचा संकल्प
शाळेच्या आठवणी जपण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांमधील मैत्री, बंधुभाव आणि परस्पर सहकार्य कायम राहावे, यासाठी भविष्यात भक्कम ‘एल्युमिनी ग्रुप’ (Alumni Group) स्थापन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
तब्बल १९ वर्षांनंतर झालेल्या या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पुन्हा भेटण्याचे वचन देत या अविस्मरणीय  सोहळ्याची सांगता झाली.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!