शगुन चौकात बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; मोठे नुकसान


शगुन चौकात बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; मोठे नुकसान

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौक परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. कार्यालयातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
आगीमुळे कार्यालयातील संगणक, फर्निचर, वायरिंग तसेच अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!