दुष्काळी यादीत उर्वरित तालुक्यांचाही विचार; शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत


दुष्काळी यादीत उर्वरित तालुक्यांचाही विचार; शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांमधील पीक आणि पाण्याची परिस्थिती तपासून ट्रिगर-३ अंतर्गत आवश्यकतेनुसार या तालुक्यांचाही समावेश केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या मंजूर उपाययोजनांनुसार विविध मदत व सवलती दिल्या जाणार आहेत. यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांमधील परिस्थितीचाही आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला सरकारी मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!