कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती सोहळा विद्यालयांमध्ये अतिशय आनंद जल्लोषात साजरा

टाकळीभान प्रतिनिधी-न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती सोहळा विद्यालयांमध्ये अतिशय आनंद जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळीपारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन मंजाबापू धोंडीबा थोरात हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वारकरी दर्पणचे संपादक हरिभक्त परायण सचिन दिलीपराव आहेर सर होते प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड याचे माजी प्राचार्य मधुकर दाभाडे सर, विद्यालयाची माजी विद्यार्थी पुणे येथील उद्योजक विजयराव घुले सर, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्वाती पटारे मॅडम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच विद्यालयाची माजी सेवक स्वर्गीय एस बी चव्हाण सर यांचे सुपुत्र अविनाश शामराव चव्हाण एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कोयना डॅम आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी व थोर देणगीदार देविदास रणनवरे यांनी कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट असे भोजन देऊन अन्नदान केले. रयत शिक्षण संस्था सातारा चे सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत भालेराव, बापूसाहेब पटारे,स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य तथा टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राहुल आप्पासाहेब पटारे, टाकळीभान येथील थोर शिवव्याख्याते व व्यापारी नवाज भाई शेख, अहिल्यादेवी वस्तीगृहाचे अधीक्षक गलांडे सुरेश सर ,माजी प्राचार्य जयकर मगर सर, शिवाजीराव धुमाळ, थोर कवी पोपटराव पटारे, सर,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अनिल दाभाडे, रावसाहेब रणनवरे, सौ. रत्नमाला रणनवरे गावातील प्रतिष्ठित शिक्षण प्रेमी ग्रामस्थ पत्रकार बंधू भगिनी आणि पाहुण्यांबरोबर आलेला मोठा मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रमाचा आनंद लुटला.
याप्रसंगी सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य व सल्लागार समिती सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य शिंदे आर. एम. आणि विद्यालयाचे पर्यवेक्षक जरे एस. एस. सरांनी स्वागत केले.प्रमुख पाहुण्यांचे शुभ हस्ते इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी ज्या रांगोळी काढल्या होत्या त्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री राठोड एस.एस. सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या उत्कृष्ट अशा झांज पथकाद्वारे केले. त्यानंतर शक्ती स्थळाजवळील कर्मवीर पुतळा पूजन करण्यात आले तदनंतर कर्मवीर भाऊराव पाटील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब पटारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. , त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ सेविका पालवे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले आणि गुणवत्तेचा आलेखावर एक प्रकाश टाकला तसेच विद्यालयाला वेळोवेळी मदत करणाऱ्या विविध थोर देणगीदारांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले . यानंतर विद्यालयातील पाचपिंड ए.ए. सरांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला व त्यांचा सत्कार केला. विद्यार्थी मनोगतमध्ये सुरुवातीला इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सुप्रिया प्रसाद कदम हिने व इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी शिवन्या रवींद्र बनकर या दोन्ही विद्यार्थिनींनी कर्मवीर अण्णांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह मध्ये घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांमधील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी पाहुणे व प्रमुख वक्ते यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे माध्यमिक विभागाचे पारितोषिक वितरण वाचन श्रीमती पालवे एन. ए.श्रीमती नलवडे एस.बी. श्री कोकाटे एस.पी. श्री देवरे बी.व्ही. यांनी केले तर कनिष्ठ महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण वाचन महाविद्यालयाचे प्राध्यापक जाधव एस.यू.सर व श्री पाचपिंड ए.ए. यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन आहेर सर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या देसाई ते पाटील आडनावाचा पूर्ण इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला तसेच कर्मवीर भाऊराव पाटील तत्कालीन अशिक्षित असलेल्या मागासलेल्या समाजातील बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात आणणारे अण्णा म्हणजे कलियुगातील भगीरथ याविषयी आणि कर्मवीरांना डॉक्टर पद्मभूषण व कर्मवीर या पदव्या कोणाच्याही वशिल्याशिवाय आणि स्वकर्तृत्वावर कशा मिळाल्या आणि अण्णांचा आदर्श आपण घेतल्यास जीवन कसे यशस्वी होते यावर प्रकाश टाकला आणि मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य मधुकर दाभाडे सर यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर अण्णांच्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या समोर ठेवले आणि विद्यार्थ्यांना त्यातून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा सल्ला दिला तसेच डांबर प्रकरणांमध्ये जसे अण्णा डगमगले नाही व सत्याची बाजू घेतली तसेच जातीभेदाच्या विरुद्ध अण्णांच्या करारी स्वभावाचे त्यांनी उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवून आदर्श जीवन जगण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर विजय सोपानराव घुले सर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून आपण आज एक पुणे या ठिकाणी उद्योजक कसे घडलो यावर प्रकाश टाकला आणि आपले मनोगत आतून आपण दृढ इच्छाशक्ती जर ठेवली आणि कठोर मेहनत व परिश्रम घेतल्यास यश निश्चित आपल्याला मिळते याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणामध्ये मंजाबापू थोरात पाटील यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमातील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि इतर मुलांनी सुद्धा मेहनत घेतल्यास त्यांनाही यशस्वी होता येईल आपल्या जीवनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे आदर्श असल्यामुळे आपण निश्चित यशस्वी होऊ असा सल्ला दिला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी चांगले सत्य जीवन जगावे असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ पाचपिंड एम. ए.यांनी केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







