येरवडा क्रीडा संकुलात क्लोरिन गळतीचा संशय; १० मुले रुग्णालयात
येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये बुधवारी रात्री क्लोरिन गळती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पूलमध्ये पोहण्यासाठी आलेल्या १३ ते १५ वयोगटातील १० मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, उपचारांनंतर सर्व मुलांची प्रकृती सामान्य असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेची येरवडा पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून साठवणूक आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 37





