अज्ञात वाहनाला बुलेटची धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार..


अज्ञात वाहनाला बुलेटची धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार.

टाकळीभान प्रतिनिधी -बुलेटने अज्ञात वाहनास पाठीमागून धडक दिल्याने तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नेवासा -श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे घडली.

या अपघातात आदित्य अंबादास अहिरे (वय १६), दीपक अंबादास अहिरे (वय १४) व चैतन्य अंबादास अहिरे (वय १२) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील अंबादास अहिरे यांची तीन मुले बुलेट मोटारसायकलवरुन नेवासा कडून श्रीरामपूरकडे येत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणतगाव फाट्याजवळ त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटला. ही बुलेट अज्ञात वाहनावर पाठीमागे जावून धडकली. अपघात एवढा भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले, पुढील तपास पोलीस करत आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!