भोकरदनमध्ये उद्या ४ ऑक्टोबरला ओबीसी समाजाची चिंतन बैठक


भोकरदनमध्ये उद्या ४ ऑक्टोबरला ओबीसी समाजाची चिंतन बैठक

सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर होणार विचारमंथन; विविध समाजघटकांचे मान्यवर उपस्थित राहणार

भोकरदन : प्रतिनिधी/ महेंद्र बेराड

भोकरदन–जाफराबाद परिसरातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने ओबीसी समाज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, भोकरदन, जि. जालना येथे होणार आहे.

या बैठकीत ओबीसी समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगार, आरक्षण तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर विचारमंथन होणार आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, मागण्या आणि भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा करण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे पाहिले जात आहे.

बैठकीसाठी ओबीसी समाजचिंतक मा. ॲड. एफ. एच. सिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच समता परिषद, जाफराबादचे तालुकाध्यक्ष मा. नंदकिशोर जाधव, माळी महासंघ, जालना जिल्हाध्यक्ष मा. गणेश हरकळ, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत मा. अभिजीत भारती सर, महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. महादूजी

सुरडकर, परिट धोबी सेवा मंडळ, भोकरदन तालुक्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री. धोंडीराम पैठणकर तसेच ओबीसी हक्क परिषद, भोकरदनचे तालुका संघटक श्री. विश्वनाथराव वरपे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीत भोकरदन तालुक्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेऊन समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याबाबत चर्चा होणार आहे. विविध समाजघटकांमध्ये समन्वय वाढविणे, तरुणांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक प्रश्नांवर एकत्रित भूमिका मांडणे तसेच शासनाच्या विविध योजना व सवलतींचा समाजातील पात्र घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीचे प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना, भोकरदन तालुकाध्यक्ष तथा अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष मा. महेंद्र बेराड सर हे उपस्थित राहणार आहेत. ओबीसी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवर विधायक पद्धतीने चर्चा करणे आणि भविष्यातील सामाजिक वाटचालीची दिशा निश्चित करणे, हा या चिंतन बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या बैठकीचे आयोजन समस्त ओबीसी समाज, मौजे भोकरदन–जाफराबाद, जिल्हा जालना यांच्या वतीने करण्यात आले असून, परिसरातील ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!