अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची कारवाई.अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या कारवाई करुन ३,०५,०००/- रु. किं.चा मुददेमाल जप्त

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुका पो.स्टे. हददीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनासह चालक व मालकावर कारवाई करुन ३,०५,०००/- रु. किं.चा मुददेमाल जप्त अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची कारवाई.
मा. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, खानापुर ते वडाळा महादेव जाणारे रोड, मुठेवाडगाव शिवारात काही इसम त्याचे कडील पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप मध्ये अवैध वाळु वाहतुक करत आहे अशी बातमी मिळाल्याने कारवाई करणेकामी अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर नेमणुकीचे पोहेकॉ सचिन धनाड, अनिल शेंगाळे, पो.कॉ. अक्षय भोसले यांना आदेशीत केले होते.
वरील आदेशान्वये सदर पथक खाजगी वाहनाने बातमीची खात्री करणेकामी रवाना होवुन मुठेवाडगाव शिवारात खानापुर ते वडाळा जाणारे रोडचे कडेला स्टाफसह सापळा रचुन थांबले असता बातमीतील हकीगती प्रमाणे एक विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप खानापुर कडुन येतांना दिसला सदर वाहनाची खात्री होताच सदर वाहन चालकास वाहन थांबण्याचा इशारा दिला असता सदर वाहन चालकाने सदरचे वाहन रस्त्याचे कडेला थांबवीले. त्या वाहनावरील चालकास पथकाने ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) साहेबराव मारुती गायकवाड, वय २४ वर्ष, रा. खानापुर, ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. त्यास गाडीचे हौदयामध्ये काय आहे अशी विचारणा करता त्याने गाडीत वाळु भरलेली आहे असे सांगीतले. त्यावेळी त्यास वाळु वाहतुकीचे वैध परवाना व मालकाविषयी विचारले असता त्याने वाळु वाहतुकीचा कुठलाही परवाना नसुन स सदर वाहनाचे मालक २) सुनिल देवकर, रा. गोंधवणी, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर हे असल्याचे सांगीतले. सदर आरोपींकडुन विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचे इंट्रा पिकअप व २ ब्रास वाळु असा एकुण ३,०५,०००/- रु.किं.चा मुददेमाल ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला आहे. व वरील नमुद आरोपीं विरुध्द श्रीरामपूर तालुका पो.स्टे.गु.र.नं. ४००/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०३(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदरची कारवाई ही मा. मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर, श्रीमती. कल्पना पवार, परी. पो. उपधीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालयातील पोहेकॉ सचिन धनाड, अनिल शेंगाळे, रामेश्वर वेताळ, संतोष दरेकर, पोकॉ/ अक्षय भोसले यांनी केली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर








