चाकूच्या हल्ल्यात जखमी होऊनही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक


चाकूच्या हल्ल्यात जखमी होऊनही १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वैमानिकाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

दुबई-तेल अवीव: ‘फ्लायदुबई’च्या विमानात चाकूच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही धैर्याने परिस्थितीचा सामना करत सुमारे १८० प्रवाशांचे प्राण सुरक्षित ठेवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले. अत्यंत धोकादायक परिस्थितीत गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य, शौर्य आणि अढळ निर्धार उल्लेखनीय असल्याचे मोदी यांनी म्हटले.
कॅप्टन स्मित मच्छार यांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे विमानातील प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत झाली. त्यांच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी

P


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!