जिल्हा बँकेच्या संचालकपदी करण ससाणे यांची बिनविरोध निवड, टाकळीभान मध्ये जल्लोष…


जिल्हा बँकेच्या संचालकपदी करण ससाणे यांची बिनविरोध निवड, टाकळीभान मध्ये जल्लोष


टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर नगरपालीकेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहिल्यानगर संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल टाकळीभान येथे कॉग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थांच्यावतीने फटाके फोडून मोठ्या जल्लोषात आनदोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीरामपूर नगरपालीकेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांची नूकतीच जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर संचालक पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल टाकळीभान स्टँडपरिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संत सावताचे संचालक विलास दाभाडे, संत सावताचे माजी उपाध्यक्ष प्रकाश दाभाडे, बापूसाहेब शिंदे, महेंद्र संत, काकासाहेब रणनवरे, मोहन रणनवरे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, रणजीत मगर, विलास बोडखे, सुभाष जगताप, श्रीधर गाडे, रघुनाथ लोखंडे,आदीसह कॉग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!