नवले पुलावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, वाहतूक कोंडी​


नवले पुलावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, वाहतूक कोंडी​

​पुण्यातील सातत्याने अपघातांसाठी चर्चेत असणाऱ्या नवले पुलावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून काही चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेली वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!