पुण्यात महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून तरुणाला नागरिकांचा चोप.

पुणे : शहरातील नसरापूर आणि पर्वती भागातील ताज्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच संतापाचे वातावरण असताना, आता राजाराम पुलाजवळ आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेची छेड काढल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा परिसरात एका महिलेची छेड काढत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पकडून लाईटच्या खांबाला वायरने बांधले आणि चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









