नसरापूरच्या चिमुकलीसाठी संतप्त जनसागर रस्त्यावर; अत्याचार्याला फाशीच्या मागणीने शहर दणाणले!



नसरापूरच्या चिमुकलीसाठी संतप्त जनसागर रस्त्यावर; अत्याचार्याला फाशीच्या मागणीने शहर दणाणले!

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणाच्या निषेधार्थ आज शहरात मोठ्या संख्येने नागरिकांनी कँडल मार्च काढत संताप व्यक्त केला.
ब्राह्मण समाज बांधव, विविध सामाजिक संघटना, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत बालगंधर्व चौकातून सावरकर स्मारकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. हातात मेणबत्त्या, निषेध फलक आणि न्यायाच्या मागण्यांचे संदेश घेत नागरिकांनी शांततेच्या मार्गाने पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली.
“चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे”, “मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस कायदे करा” अशा मागण्यांसह उपस्थितांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही घोषणाबाजी न करता शांत, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात हा मार्च पार पडला.
या मोर्चातून समाजाने स्पष्ट संदेश दिला की, अशा अमानुष घटनांविरोधात संपूर्ण समाज एकवटला असून आरोपीला कठोर शिक्षा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नसरापूर प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पीडितेला न्याय मिळावा, हीच सर्वांची एकमुखी मागणी आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
[


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!