विधान भवनात १० नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी संपन्न; बच्चू कडू, दानवे, गोऱ्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
मुंबईतील विधान भवनात आज १० नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनी आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग पाचव्यांदा शपथ घेत विशेष नोंद केली.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीमुळे विधानपरिषदेच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असून राज्याच्या विधिमंडळीन प्रक्रियेत त्यांच्या सहभागाकडे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी. 9822548429






