औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची दिली हाक


औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची दिली हाक

​नवी दिल्ली:ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) या संघटनेने २० मे रोजी देशभरातील औषधांची दुकाने आणि औषध वितरण बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या देशव्यापी संपामुळे औषध पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
​
​ई-फार्मसीच्या अनियंत्रित कामकाजाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
​ऑनलाईन औषध विक्रीमुळे लहान औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वावर निर्माण झालेला धोका हे या संपाचे प्रमुख कारण आहे.
​
​ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स ही संघटना देशभरातील १२.४ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करते.
​संपाच्या काळात केवळ आपत्कालीन औषधे उपलब्ध राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
​या संपामुळे सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
​
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548426


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!