​कर्जापोटी मित्राचा खून करून स्वतःचा मृत्यू भासविणारा नराधम गजाआड; ८ महिन्यांनंतर आमगाव पोलिसांकडून छडा


​कर्जापोटी मित्राचा खून करून स्वतःचा मृत्यू भासविणारा नराधम गजाआड; ८ महिन्यांनंतर आमगाव पोलिसांकडून छडा

​गोंदिया: कर्ज फेडू न शकल्याने स्वतःचा मृत्यू भासविण्यासाठी आपल्याच मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला आमगाव पोलिसांनी तब्बल ८ महिन्यांनंतर अटक केली आहे. या धक्कादायक घटनेचा उलगडा तांत्रिक तपासाद्वारे झाला असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा होत आहे.
​काय आहे नेमकी घटना?
देवरी येथील अर्बन बँकेचे ५ लाख रुपयांचे कर्ज फेडणे २८ वर्षीय आरोपी अंतिम खोटेले याला अशक्य झाले होते. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःला मृत घोषित करण्याचा कट रचला. त्याने आपला मित्र चंद्रकुमार सराटे याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, ओळखी पटू नये म्हणून मृतदेहाला स्वतःचे कपडे आणि ओळखपत्र घालून रेल्वे ट्रॅकवर टाकून दिले, जेणेकरून सर्वांना तो स्वतः (अंतिम खोटेले) मेल्याचा भास होईल.
​८ महिन्यांनंतर असा झाला उलगडा
मृतदेह मिळाल्यानंतर सुरुवातीला तो अंतिम खोटेले याचाच असल्याचे मानले जात होते. मात्र, आमगाव पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. ८ महिने पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जिवंत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!