​पुण्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा गोळीबार; रांजणगाव परिसरातील घटना


​पुण्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा गोळीबार; रांजणगाव परिसरातील घटना

​पुण्याच्या रांजणगावजवळील सोने सांगवी गावात एका गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर आरोपींनी थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे एक पथक तपासासाठी सोने सांगवी गावात पोहोचले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही तत्काळ सतर्क होत स्वसंरक्षणासाठी आरोपींच्या दिशेने प्रतिगोळीबार केला. सुदैवाने, या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही.
​आरोपी उसाच्या शेतात पसार
गोळीबारानंतर दोन्ही आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जवळच असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. सध्या पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची विविध पथके या परिसरात दाखल झाली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी,


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!