राजधानी एक्सप्रेसच्या AC डब्याला भीषण आग; मध्य प्रदेशातील रतलामजवळ मोठी दुर्घटना टळली
रतलाम (मध्य प्रदेश) : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या ‘B-1’ वातानुकूलित (AC) डब्याला रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात भीषण आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. आगीने वेढलेल्या ‘B-1’ डब्याला गाडीच्या उर्वरित रचनेपासून (रेक) वेगळे करण्यात आले, ज्यामुळे आग इतर डब्यांमध्ये पसरण्यापासून रोखता आली.
घटनास्थळी रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, सर्व प्रवासी सुरक्षित असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822448429










