ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात १५० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा पदक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचा तसेच शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी विद्या घटवाई, अदिती जोशी, अनिता जोशी, लता दवे, तृप्ती तारे, प्रज्ञा लोणकर, आरती कुलकर्णी, आनंद दवे, मनोज तारे, नितीन शुल्क, हर्षद ठकार , संजय देशमुख,राजेंद्र देशपांडे उमेश कुलकर्णी आणी इतर पधादिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात धर्मपात्रे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शैक्षणिक प्रगतीसोबत संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. तसेच आनंद दवे सरांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित पालकांना शैक्षणिक प्रगती, योग्य दिशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ब्राह्मण महासंघाचे विश्वस्त मनोज तारे यांनी महासंघाच्या विविध सामाजिक कार्यांची माहिती दिली, तर विश्वस्त श्वेता कुलकर्णी यांनी ब्राह्मण महासंघाच्या पतसंस्थेविषयी सविस्तर माहिती देत समाजहिताच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.अदिती जोशी यांनी महांसघाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्या घटवाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश कुलकर्णी यांनी मानले. उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. ब्राह्मण महासंघाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










