‘नीट’ पेपरफुटी प्रकरण: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी


​’नीट’ पेपरफुटी प्रकरण: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची सीबीआय कोठडी

​लातूर: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

नीट पेपरफुटीच्या धाग्यादोऱ्यांचा तपास करत असताना सीबीआयने यापूर्वी मोटेगावकर यांची ट्रान्झिट रिमांड घेतली होती. दोन दिवसांच्या या ट्रान्झिट रिमांडमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान, मोटेगावकर यांच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले. या पुराव्यांच्या आधारे सीबीआयने मोटेगावकर यांना अटक केली.

अटकेनंतर आज सीबीआयने मोटेगावकर यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले होते. तपासासाठी आणि पेपरफुटीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून शिवराज मोटेगावकर यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे.
​या अटकेमुळे लातूरसह राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, या ९ दिवसांच्या कोठडीत सीबीआयच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!