MPSC ने लिपिक-टंकलेखक भरतीत मोठा बदल; टंकलेखन चाचणी रद्द


MPSC ने लिपिक-टंकलेखक भरतीत मोठा बदल; टंकलेखन चाचणी रद्द

मुंबई — महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क मधील लिपिक-टंकलेखक व कर सहाय्यक पदांच्या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आयोगाने या पदांसाठी स्वतंत्रपणे घेत असलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र टंकलेखन चाचणीची परीक्षा घेतली जात होती. नवीन नियमांनुसार आता उमेदवारांची अंतिम निवड फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल; टंकलेखन चाचणीचा अतिरिक्त टप्पा वगळण्यात आला आहे.
टंकलेखन प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासन स्तरावर थेट नियुक्तीच्या वेळी केली जाईल. या बदलामुळे भरती प्रक्रिया वेगवान होणार आणि अंतिम निकाल लागणारा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.
ही व्यवस्था ‘गट-क मुख्य परीक्षा २०२५’ पासून लागू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे स्पर्धेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!