​पुण्याच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास: बनवले भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान


​पुण्याच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास: बनवले भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान

​पुणे येथील एमआयटी कला, डिझाइन व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ‘टीम स्कायट्रॅक’ने एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. ‘प्रोजेक्ट गरुडा’ अंतर्गत या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे आणि वजनदार रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक फिक्सड-विंग विमान तयार केले आहे.
​महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि विक्रम:
​या विमानाचा विंगस्पॅन ९.२५ मीटर असून त्याचे वजन २६१ किलो आहे.
​या कामगिरीची ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृत नोंद झाली आहे.
​प्रा. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ४ वर्षांच्या सखोल संशोधनानंतर हे यश संपादन केले.
​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
​या विमानाचे यशस्वी उड्डाण धुळे येथे पार पडले. पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे

.पत्रकार : उमेश कुलकर्णी,9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!