६० कोटींनंतर आता ७ कोटींचा नवा घोटाळा; तत्कालीन आयुक्त शेखर सिंहांच्या भूमिकेवर स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंचा संशय
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. ६० कोटींच्या घोटाळ्याची चर्चा ताजी असतानाच, आता ७ कोटी रुपयांचा आणखी एक नवीन घोटाळा समोर आल्याचा खळबळजनक दावा अभिषेक बारणे यांनी केला आहे.
याप्रकरणी बारणे यांनी तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या भूमिकेवर थेट संशय व्यक्त केला आहे. महापालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये आणि कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत, या नवीन ७ कोटींच्या घोटाळ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ६० कोटींच्या प्रकरणानंतर हे नवे प्रकरण समोर आल्याने आता यावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
पत्रकार: उमेश कुलकर्णी (9822548429)





