​सांगलीत स्टंटबाजी बेतली जीवावर; ट्रॅक्टरखाली चिरडलेल्या चालकाचा थरारक बचाव


​सांगलीत स्टंटबाजी बेतली जीवावर; ट्रॅक्टरखाली चिरडलेल्या चालकाचा थरारक बचाव

​मळणगाव (सांगली): सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रॅक्टरवर स्टंट करून चढण्याच्या प्रयत्नात चालक विजय माळी यांचा गंभीर अपघात झाला.
​ट्रॅक्टर सुरू असताना त्यावर चढण्याचा प्रयत्न करत असताना माळी यांचा पाय घसरला आणि ते थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आले. या भीषण अपघातात ते थोडक्यात बचावले असले, तरी त्यांच्या ३-४ बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
​अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ‘जीवावर आले पण बरगडीवर निभावले,’ अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. सोशल मीडियावरील स्टंटबाजी किती महागात पडू शकते, याचे हे एक जिवंत उदाहरण समोर आले आहे.

​पत्रकार: उमेश कुलकर्णी
(9822548429)


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!