बीडमध्ये लग्नातील आतिषबाजी बेतली जीवावर: फोटोग्राफर गंभीर जखमी, लाखो रुपयांचे साहित्य खाक
बीड:बीडमधील बार्शी रोडवरील आशीर्वाद मंगल कार्यालयात २८ एप्रिल रोजी एका विवाह सोहळ्यादरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे भीषण दुर्घटना घडली. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या या आतिषबाजीमुळे फोटोग्राफर अभिषेक कदम हे गंभीररीत्या भाजले आहेत.
या दुर्घटनेत अभिषेक कदम यांचे लाखो रुपयांचे कॅमेरा व इतर व्यावसायिक साहित्य जळून खाक झाले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
असोसिएशनची आक्रमक भूमिका:
या घटनेनंतर बीड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषी इव्हेंट आयोजक आणि फटाके व्यवस्थापकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मंगल कार्यालयांमध्ये कडक सुरक्षा नियमावली लागू करण्याची मागणीही जोर धरत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी, ९८२२५४८४२९